१. सौरयाग
१ अ. सौरयागाच्या वेळी मंत्रपठण करणार्या श्री. वझेगुरुजींमध्ये आणि खोबर्याच्या वाटीतल्या गुळामध्ये उजव्या सोंडेच्या गणपतीचेे दर्शन होणे : ‘सौरयागाच्या वेळी श्री. वझेगुरुजी मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी त्यांच्यामध्ये मला फिकट गुलाबी रंगाच्या उजव्या सोंडेच्या गणपतीचेे दर्शन झाले. पूजा संपल्यानंतर आम्ही पूजा मांडलेल्या ठिकाणी सौरयागाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तेथे खोबर्याच्या वाटीत गूळ ठेवलेला होता. त्याच्याकडे पाहिल्यावर मला परत उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन झाले.
२. ऋषियाग
२ अ. आश्रमात सप्तऋषींचे पूजन आणि गो देवतेकडून आशीर्वाद मिळावा; म्हणूून पूजा आणि यज्ञ केल्यावर ३३ कोटी देवतांना होणार्या प्रार्थनेचे कारण उलगडणे : ३.१.२०१९ या दिवसापासून माझ्याकडून आपोआप ३३ कोटी देवतांच्या चरणी सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होत्या. त्या वेळी माझ्या मनात सारखा विचार येत होता की, ‘अकस्मात् माझ्याकडून ३३ कोटी देवतांना का प्रार्थना होत आहेत ?’ ९.१.२०१९ या दिवशी आश्रमात १२ वाजता सप्तऋषींचे पूजन आणि गो देवतेकडून आशीर्वाद मिळावा; म्हणूून पूजा आणि यज्ञ करण्यात आला. त्या वेळी माझ्याकडून ३३ कोटी देवतांना प्रार्थना होण्याचे कारण मला कळले.
२ आ. ऋषियागाच्या वेळी आश्रमात पांढरी शुभ्र गाय येऊन ती चैतन्य देऊन गेल्याचे जाणवणे : ऋषीयागाच्या वेळी श्री. सिद्धेश करंदीकरदादा पूजन करत असतांना दुपारी २ वाजता मला असे दिसले की, पांढरी शुभ्र गाय फाटकाच्या आत येऊन परत उजव्या दिशेने गेली. तेव्हा ‘ती आश्रमात येऊन साधकांना चैतन्य देऊन गेली’, असे मला वाटले आणि ‘त्या गायीच्या माध्यमातून ३३ कोटी देवीदेवता आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवले.
२ इ. यज्ञ संपल्यावर सप्तऋषींचे दर्शन घेत असतांना पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या वेगवेगळ्या ऋषिमुनींचे दर्शन होणे : सद्गुरु (सौ.) बिंदाताई आरती करत असतांना त्या आरतीभोवती पांढरा प्रकाश दिसला. त्या सर्वांना आरती देत असतांना तो पांढरा प्रकाश सर्वत्र पसरत असल्याचे जाणवत होते. यज्ञ संपल्यावर सप्तऋषींचे दर्शन घेत असतांना वेगवेगळ्या ऋषिमुनींचे दर्शन झाले. सर्वार्ंनी पांढर्या रंगाचे वस्त्र आणि त्याला हिरवी किनार असलेले वस्त्र धारण केलेले दिसले. सर्व पुरोहितांना बघून भावजागृती होत होती. आतून त्यांनासुद्धा नमस्कार केला जात होता.
‘परात्पर गुरु डॉक्टर, मला या यज्ञाला बसण्याची संधी दिल्याविषयी आणि पूर्वसूचना देऊन आधीच प्रार्थना कृतज्ञता करून घेतल्याविषयी अन् अनुभूती दिल्याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |