
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात मी त्यांना सांगितले, ‘‘एके वर्षी पौष पौर्णिमेच्या रात्री आकाशातील चंद्राभोवती तेजोवलय दिसत होते आणि त्या वलयात सप्तरंग दिसत होते. या संदर्भात एक साधक म्हणाला, ‘‘परम पूज्य डॉ. आठवले खोलीच्या बाहेर आले असतील आणि त्यांनी चंद्राकडे पाहून हात फिरवला असेल; म्हणून चंद्र एवढा तेजस्वी दिसत आहे.’’ माझे हे बोलणे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर हसले आणि म्हणाले, ‘‘हे गंमत म्हणून लिहून दे !’’

त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘परम पूज्य, ही गंमत नाही. खरोखरच तुम्ही काहीही करू शकता. पंचमहाभूते, चराचर, सारी सृष्टी सर्वकाही तुमच्या नियंत्रणाखाली आहे. तुम्ही आगाशीतून समोरच्या डोंगराच्या दिशेने बोट दाखवल्यावर त्या डोंगरावर प्रकाश दिसू लागतो. तुमच्या बोटातून उदबत्तीच्या धुराप्रमाणे चैतन्य प्रक्षेपित होते. हे सर्व आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. मग ‘चंद्राला तेजस्वी करणे’, हे तुमच्यासाठी शक्य आहे !
‘सर्वकाही स्वतः करायचे आणि नामानिराळे रहायचे’, ही तुमची किमया आम्ही जाणून आहोत परम पूज्य ! त्यामुळे तुम्ही ‘मी काही करत नाही’, असे म्हणालात, तरी ‘सर्वकाही तुम्हीच करत आहात’, हे आम्हाला ठाऊक आहे.’
– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |