परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीराम यागात आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांवर झालेले परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यज्ञयागाविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

२१ एप्रिल २०२१ या दिवशी रामनवमी झाली. त्यानिमित्ताने…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्युयोग टळावा आणि हिंदु-राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावे, यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम याग’ करण्यात आला. श्रीराम यागात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांनी गुळवेल, सुंठ, काळीमिरी आणि सुकलेली पिंपळी या हवन-द्रव्यांची आहुती दिली.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत पुढील २ प्रयोग करण्यात आले.

१ अ. प्रयोग क्र. १ – यज्ञ संपण्याच्या आदल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांकडे पहाण्यापूर्वी, पाहिल्यानंतर आणि हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्यानंतर हवन-द्रव्यांची निरीक्षणे करण्यात आली.

१ आ. प्रयोग क्र. २ – यज्ञाच्या शेवटच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श करण्यापूर्वी, ‘श्री रामचंद्राय नम: ।’ हा नामजप करत हस्तस्पर्श केल्यानंतर, तसेच नामजप न करता हस्तस्पर्श केल्यानंतर हवन-द्रव्यांची निरीक्षणे करण्यात आली.

२. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांकडे पहाणे, हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श करणे इत्यादी कृती केल्याने हवन-द्रव्यांवर झालेले परिणाम वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांकडे पहाणे आणि हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श करणे, या कृती केल्यावर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : प्रयोग क्र. १ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांकडे केवळ (नुसते) पाहिल्यावर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ६७.९१ मीटर वाढ होऊन ती ७७.४६ मीटर झाली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्यानंतर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अजून ६७.८२ मीटर वाढ होऊन ती १४५.२८ मीटर झाली.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हवन-द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श करण्यापेक्षा नामजप न करता हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होणे : प्रयोग क्र. २ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श केल्यानंतर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १०८.६१ मीटर वाढ झाली. त्यांनी हवन-द्रव्यांना नामजप न करता हस्तस्पर्श केल्यानंतर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १६०.१७ मीटर वाढ झाली; म्हणजे नामजप करण्यापेक्षा नामजप न करता हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्यावर हवन-द्रव्यांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हवन-द्रव्यांकडे पहाणे’ आणि ‘हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श करणे’ या कृती केल्याने हवन-द्रव्यांतील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले ‘परात्पर गुरु’पदावरील समष्टी संत असल्याने त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होते. या प्रयोगात परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या नेत्रांतून प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वामुळे (चैतन्यामुळे) हवन-द्रव्ये चैतन्याने भारित झाली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे हवन-द्रव्यांमध्ये पुष्कळ चैतन्य संक्रमित झाले.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हवन-द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श करण्यापेक्षा नामजप न करता हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांतील चैतन्यात पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होणे : ‘परात्पर गुरु’पदावरील समष्टी संतांना नामजप करण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या केवळ संकल्पाने सर्व कार्ये सिद्ध (पूर्ण) होतात. (‘परात्पर गुरु’पदावरील संत अधिकतर निर्गुणातून कार्यरत असतात; पण समष्टी-कार्याच्या आवश्यकतेनुसार ते निर्गुण स्थितीतून (उच्च आध्यात्मिक स्थितीतून) सगुण स्थितीत येतात.) ‘परात्पर गुरु’पदावरील संतांनी नामजप करणे म्हणजे निर्गुण-स्थितीतून सगुण-स्थितीत येणे होय. सगुणापेक्षा निर्गुण सूक्ष्म असल्याने अधिक प्रभावी आहे. याचाच प्रत्यय ‘प्रयोग क्र.२’ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श करणे आणि नामजप न करता हस्तस्पर्श करणे या कृतींतून पुढीलप्रमाणे आला.

१. परात्पर गुरु डॉक्टरांनी हवन-द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श केल्यावर हवन-द्रव्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन तिची प्रभावळ ११७.९१ मीटर झाली. हा परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप केल्याचा परिणाम आहे.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप न करता हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्यावर हवन-द्रव्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन तिची प्रभावळ १६९.८२ मीटर झाली; म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करण्यापेक्षा नामजप न करता हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांतील चैतन्यात पुष्कळ अधिक वाढ झाली. हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाचा परिणाम आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.१.२०२१)

ई-मेल : [email protected]