जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याचा नातेवाइकांचा आरोप
नगर – रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. वाकडी गावातील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात एका कोरोना रुग्णावर उपचार चालू होते. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ‘डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, तसेच ऑक्सिजन वेळेवर मिळाला नसल्याने रुग्ण दगावला’, असा आरोप नातेवाइकांनी केला आणि गोंधळ घालून अतीदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे.