कच्चा माल सिद्ध करणार्या बालाजी अमाईन्सचे विस्तारीकरण करण्यात येणार
सोलापूर – रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल सोलापूर येथे सिद्ध करण्यात येत आहे. येथील ‘बालाजी अमाईन्स’ या आस्थापनात रेमडेसिविरसाठी लागणारे २ सॉल्व्हंट आणि एक कच्चा माल सिद्ध करण्यात येत आहे. या इंजेक्शनसाठी २७ घटकांची आवश्यकता असते. त्यातील ‘ट्रायइथाईल अमाईन’, ‘डायमिथाईल फार्मामाईड’, ‘असिटोनायट्रायल’ या ३ प्रमुख कच्च्या मालाची निर्मिती हे आस्थापन करते.
१. कच्चा माल सिद्ध करण्यासाठी इथेनॉलचा वापर होतो. रेमडेसिविरची निर्मिती करण्यासाठी आवश्यक काही घटक महाराष्ट्रातूनच मागवले जातात; मात्र काही घटक हे विदेशातून मागवावे लागतात, अशी माहिती आस्थापनाचे प्रमुख राम रेड्डी यांनी दिली.
२. ‘डायमिथाईल फार्मामाईड’ हे अमाईन्स संपूर्ण देशात केवळ सोलापूरात सिद्ध होते. त्यामुळे रेमडेसिविर सिद्ध करणार्या सर्व आस्थापनांना बालाजी अमाईन्स या कच्च्या मालाचा पुरवठा करत आहे.