रामनाथी आश्रमात श्रीरामाचा सामूहिक नामजप करतांना श्री. धनंजय हर्षे यांनी अनुभवलेली भावस्थिती !

श्री. धनंजय हर्षे

१. श्रीरामाचा नामजप आपोआप चालू होणे

‘सामूहिक नामजप चालू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी सभागृहात येऊन आसंदीवर बसल्यावर माझा श्रीरामाचा नामजप आपोआप चालू झाला.

२. संत बसलेल्या ठिकाणी चैतन्याचा गोळा आणि साधकांच्या जागी त्यांचे तोंडवळे
न दिसता देवता बसलेल्या दिसणे

​३ – ४ वेळा मला वेगवेगळ्या दिवशी संत बसलेल्या ठिकाणी चैतन्याचा गोळा दिसला. तेथे बसलेल्या इतर साधकांचे तोंडवळे दिसत नव्हते. तिथे मला देवता बसलेल्या दिसल्या. सर्वांच्या भोवती सोनेरी रंगाची छटा होती.

३. नामजप करतांना निर्माण होणारी भावस्थिती

परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर मला नामजप शांतपणे ऐकायला येतो. नामजप एका नादासारखा वाटतो आणि त्या नादासमवेत माझा नामजप चालू होतो. नामजपाच्या या आवाजाचे मला शब्दांत वर्णन करता येत नाही. त्यामुळे माझा शरणागतभाव जागृत होतो आणि नामजपावर पूर्ण एकाग्रता साधली जाते. मला प्रतिदिन ४० मिनिटे ही स्थिती अनुभवता येते. ‘श्रीराम’ या तीन शब्दांत इतका गोडवा निर्माण होतो की, त्यामुळे आतूनच नामजप चालू होतो.’

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२०)