पुणे विद्यापिठाच्या अभियांत्रिकीच्या पेपरमध्ये आकृत्याच छापल्या नाहीत !

अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये त्रुटी रहाणे गंभीर आहे. याविषयी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करत उपाय काढणे आवश्यक !

पुणे विद्यापिठ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रथम सत्र परीक्षेत अभियांत्रिकीच्या एका पेपरमध्ये प्रश्‍नातील आकृत्या छापल्या गेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी आल्या. विद्यार्थ्यांना केवळ पर्याय दिसत असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत. अभियांत्रिकीचा ‘हायड्रोलिक अँड पेन्यूमेटीक्स’ या विषयाच्या पेपरमध्ये आकृतीवर आधारित प्रश्‍न होते; पण ८ प्रश्‍नांमधील आकृत्या न दिसता केवळ प्रश्‍नाचे पर्याय दिसत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या हेल्पलाईनवर केली आहे.