कोरोनाशी लढण्यासाठी प्राणायाम करून रोगप्रतिकार शक्ती वाढवा ! – योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – सध्या कोरोना लसीकरणावरून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. डॉक्टरांनी लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांना एकदा कोरोना झाला होता त्यांना ६ मासांमध्ये पुन्हा झाला. लसीकरणाच्या ६ मासांनंतर रोग प्रतिकारक क्षमता संपते. अशात सामाजिक सुरक्षित अंतर आणि मास्क यासह आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गुळवेल आणि तुळस यांचे सेवन करावे, तसेच प्राणायाम करावा, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते. ‘मी कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

योगऋषी रामदेवबाबा यांनी मांडलेली सूत्रे

१. लसीकरणानंतर शरिरात अँटीबॉडीज (प्रतिजैविके) निर्माण होतात. जर लस घेणार्‍या व्यक्तींनी योग केला, तर ३० ते ५० टक्के अधिक अँटीबॉडीज वाढतात. यासाठी लसीकरणासमवेतच योग करणेही आवश्यक आहे.

२. कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांचा मृत्यू होत नाही, तर कोरोनाग्रस्त असणार्‍यांना रक्तदाब, मधुमेह, श्‍वसनरोग आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर समस्या असणार्‍या लोकांचा मृत्यू होतो.

३. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर नियमित कराच; पण त्यासमवेत योग आणि आयुर्वेद यांचा डबल डोसही नक्की घ्यावा.

४. कोरोनामुळे अनेकदा पचनाच्या समस्या निर्माण असतात. अशांनी पचनासाठी चांगल्या असतील अशाच पदार्थांचे सेवन करावे.

५. लोकांची कच्चा कांदा खावा, त्याने चांगली झोप येईल. सर्वांनी साधे जेवण घ्यावे आणि जंक फूड टाळावे.