श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई (टीप), म्हणजे आम्हा साधकांची आध्यात्मिक आई ।
आदिशक्ती स्वरूप साक्षात् महालक्ष्मी ।
दोष अन् अहंचा संहार करिती होण्यास आमुची प्रगती ॥ १ ॥
गुरुमाऊलींप्रमाणे आमची सर्वार्थांनी घेतात काळजी ।
आवश्यक त्या वेळी आम्हाला करतात मार्गदर्शन ॥ २ ॥
त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला मिळतो आनंद ।
मनातील सर्व अनावश्यक विचार होऊन जातात बंद ॥ ३ ॥
सर्वांनाच वाटतो त्यांचा नेहमी आधार ।
गुरुमाऊली सतत आमच्या मनामध्ये राहू देत आता सेवेचे विचार ॥ ४ ॥
साधकाला काय आवश्यक आहे, ते त्या अचूक जाणतात ।
साधकांची त्यातून त्या प्रगती करवून घेतात ॥ ५ ॥
सर्वत्र होणार आता हिंदु राष्ट्राचा जयजयकार ।
तुमच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करू आम्ही ।
केवळ साधनेचे प्रयत्न वाढवा, असे म्हणाल सर्वांना तुम्ही ॥ ६ ॥
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥ ७ ॥
शब्द अपुरे आहेत तुमचे वर्णन करण्यास ।
कृतज्ञता व्यक्त करतो या कोमल गुरुचरणांस ॥ ८ ॥
टीप – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |