केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केले घोषणापत्र !

धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्‍वासन !

केरळमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी घोषणापत्र प्रसिद्ध करतांना प्रकाश जावडेकर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने त्याचे घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यात शबरीमलाच्या परंपरांचे रक्षण करण्यासाठी कायदा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच ‘धर्मांतरावरही बंदी घालण्यात येईल’, असेही म्हटले आहे.

भाजपने त्याच्या घोषणापत्रात आंतकवादविरोधी पथक निर्माण करण्यासमवेतच धार्मिक हत्यांच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याचेही म्हटले आहे. तसेच महसुलाचे स्रोत म्हणून सरकार दारू आणि लॉटरी यांवर अती अवलंबून आहे. हे परावलंबित्व अल्प केले जाईल, असेही आश्‍वासन देण्यात आले आहे.