१. दायित्व घेऊन सेवा करणे
‘पू. देयान ग्लेश्चिच यांना सेवेची तळमळ असून ते दायित्व घेऊन नवीन सेवा करतात. ‘दायित्व घेऊन सेवा करणे’ या त्यांच्या गुणामुळे देवही त्यांच्याकडून कार्य करवून घेतो. ‘समष्टी सेवेचे दायित्व घेणे’, हा आध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम मार्ग आहे’, असे ते म्हणतात.
२. ते ‘प्रत्येक सेवा माझी आहे’, या भावाने सेवा करत असल्याने त्यांना सेवेत नवीन कल्पना, तसेच सेवेतील अडचणींवर उपाययोजना सुचतात.
३. भावपूर्ण सेवा करणे
‘एखाद्या सेवेत अडचणी निर्माण झाल्यावर त्यांवर उपाययोजना काढता येणार नाही’, अशी त्यांच्या मनात जराही शंका नसते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व करवून घेणारच आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असते. ते असा भाव ठेवूनच सेवेला आरंभ करतात.
४. एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे
एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू होण्यापूर्वी ‘अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत कसे पोचता येईल ? त्यांच्या शंकांचे निरसन कसा करता येईल ?’, याचे पू. देयानदादा सतत चिंतन करत असत. ते ‘या सेवा अन्य कुणीतरी करतील किंवा या सेवांसाठी अन्य कुणीतरी उपाययोजना काढतील’, याची वाट पहात नसत. ‘प्रत्येक सेवा माझीच आहे’, असा भाव ठेवून ते प्रत्येक सेवा करतात. त्यांच्यातील या गुणामुळे सामाजिक माध्यमांचे (सोशल मिडिया) व्यासपीठ वापरून त्यांनी ‘समाजात अध्यात्मप्रसार कसा करायचा ?’, याची एक धारिकाच सिद्ध केली होती. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संशोधन कार्यातही त्यांचे साहाय्य झाले आहे.’
– श्री. कृष्णा मांडवा, अमेरिका (३.१.२०२०)