खासगी कार्यालये आणि आस्थापने यांमध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याचा शासनाचा आदेश

डावीकडे उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापने यांमध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याचा आदेश काढला आहे. यामध्ये आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन या क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. या शासन निर्णयामध्ये उत्पादनक्षेत्रात कामाच्या पाळ्या वाढून काम करण्याचे सुचवण्यात आले आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या किती असावी, याविषयी त्यांना ठरवण्यास सांगण्यात आले आहे. नाट्यगृहे आणि सभागृहे यांनाही ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. ‘सभागृहांचा उपयोग अन्य कार्यक्रमांसाठीही करता येणार नाही’, असे या आदेशात म्हटले आहे.