भाग १.
१. प्रारब्ध आणि साधना
१ अ. प्रारब्ध नष्ट करण्यासाठी साधना केली जाते !
साधक : मी महसूल (राजस्व) विभागात (रेव्हेन्यू डिपार्टमेंट) चाकरी करतो. नोकरीची साधनेशी त्याची तुलना करणे म्हणजे जमीन-असमानाची तुलना करण्यासारखे आहे; परंतु आपल्या कृपेने चाकरी करतांना तेथेही साधनाच होतेे.
परात्पर गुरु डॉक्टर : पुष्कळ छान !
साधक : ‘चाकरीमुळे देवाण-घेवाण अधिक निर्माण होईल आणि आमचे (नवीन) प्रारब्ध निर्माण होईल, तर माझी साधनेत प्रगती होणार नाही’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर : नाही. ‘प्रारब्ध, प्रारब्ध’ बोलून रडत रहायचे नाही. साधक प्रारब्ध नष्ट करण्यासाठीच साधना करतो, नाही तर साधना का करायची ? संपूर्ण जीवनभर आमचा ‘प्रारब्ध, प्रारब्ध’ हाच जप चालू राहील. त्याला कसलीच किंमत नाही. काहीच अर्थ नाही !
साधक : ‘माझे क्रियमाण चुकीचे, तर होणार नाही ना !’, याची भीती वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठीच साधनेचे महत्त्व अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन समजावून सांगायचे. त्यामुळे क्रियमाण योग्य होते. चुकांचा विचार नाही करायचा.
१ आ. आई-वडिलांच्या आपापसांत होणार्या भांडणाकडे साक्षीभावाने पहाणे
साधक : आई-बाबांमध्ये आपापसांत पुष्कळ भांडणे होतात.
परात्पर गुरु डॉक्टर : कुटुंबातील सदस्य (फॅमिली मेंबर) एकमेकांसह का असतात ? त्यांचे प्रारब्ध आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसारच होतात. पती-पत्नीमध्ये देवाण-घेवाण हिशोब प्रारब्धातील ५० टक्के असतो. मुले आणि आई-वडील यांच्याशी देवाण-घेवाण हिशोब १० टक्के आणि इतर नातेवाईक, आपण जेथे रहातो, ज्या कार्यालयामध्ये काम करतो तेथील लोक, त्यांच्याशी घेवाण-देवाण हिशोब १० टक्के असतात. बाकीचे ३० टक्के जीवन-प्रवासात कधीतरी भेटतात, उदा. आगगाडीने (रेल्वेने) जात असतांना तेथे कुणाशी काहीतरी प्रसंग होतात. असे जे वेगवेगळे प्रसंग असतात, ते आपले प्रारब्ध असते. त्यांचे (आई-वडिलांचे) प्रारब्ध आपण कसे पालटू शकतो ? सोडून द्या. त्यांच्याकडे साक्षीभावाने पहा.
साधक : प्रयत्न करतो.’
(क्रमश: उद्याच्या अंकात)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/457578.html