महंत श्री मंडलेश्‍वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते !

स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

नाशिक – महंत श्री मंडलेश्‍वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांची हिंदु महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या महासभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. वर्ष १९०६ मध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर आणि ब्रिटीश सरकारने वर्ष १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणांतर्गत स्वतंत्र मुस्लिम मतदारांची स्थापना केल्यावर हिंदु समुदायाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ‘हिंदु महासभा’ ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेचे संस्थापक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मदन मोहन मालवीय आणि लाला लाजपतराय आहेत.