राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.२.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

महाराष्ट्रात प्रशासन असे काही आहे का ?

‘शिरूर (जिल्हा पुणे) तालुक्यातील न्हावरे गावात एक ३७ वर्षीय महिला नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिच्यावर अज्ञाताकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या महिलेने त्याला विरोध केला म्हणून तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे डोळे निकामी झाले असल्याची घटना ३.११.२०२० च्या रात्री  घडली. या प्रकरणी आतापर्यंत एका संशयिताला अटक करण्यात आली.’


भारतात अनेक ठिकाणी आक्रमकांची नावे असणे, हे देशाला लज्जास्पद ! हे आहे भारतावर राज्य करणार्‍या सर्वपक्षीय राजकारण्यांचे भारतप्रेम !

‘गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षात शासनाने गोवा मुक्तीच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, मुरगाव शहराला दिलेले पोर्तुगीज दरोडेखोर वास्को-द-गामा याचे नाव तात्काळ पालटावे, गोव्यातील विविध रस्त्यांना, तसेच सार्वजनिक ठिकाणांना असलेली पोतुगीज नावे पालटावीत आणि गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची कायमस्वरूपी देखभाल करावी, अशा मागण्या ‘भारत माता की जय’ या संघटनेकडून गोवा मुक्तीसाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वहाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आल्या.’


भाषाद्रोह म्हणजे संस्कृती आणि धर्म द्रोह !

‘बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करून त्यांना नवीन बोधचिन्ह दिले जाणार आहे. जनतेत सकारात्मक दृष्टीकोन व्हावा, याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्थसंकल्पात नमूद केले आहे.’


स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी जागे होत असलेले केंद्र आणि राज्य सरकार !

‘औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याचा निर्णय ६ जानेवारी २०२१ या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ‘औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच; कारण स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. तसेच ‘अहमदनगर’ शहराचे नावही ‘नगर’ असावे, असे आमचे मत आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक यांनी व्यक्त केले.’


सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (संदर्भ : मासिक सांस्कृतिक वार्तापत्र, १५ ऑगस्ट २००७)


उत्तरदायी पोलिसांना नोकरीतून काढून शिक्षा करा !

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी २०२१ या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे. दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी केरामसिंह याला अटक केली आहे. अटकेनंतर तो कोरोनाबाधित असल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते.