मुंबई येथील सौ. सुजाता शेट्ये (वय ५९ वर्षे) यांना अलगीकरणात असतांना नामजप आणि सेवा यांसंदर्भात आलेल्या अनुभूती
१. रुग्णालयात भरती केल्यावरही मनाची स्थिती सकारात्मक असणे
माझ्या सुनेला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. २ दिवसांनी मी आणि यजमान यांनाही ताप आल्यामुळे मुलांनी आम्हा दोघांनाही रुग्णालयात भरती केले. दोन्ही वेळा माझ्या मनाची स्थिती सकारात्मक होती.
२. नामजपातून शक्ती आणि चैतन्य मिळाल्याने गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे
कोरोनाशी लढण्यासाठी मला मिळालेला नामजप मी ६ घंटे करण्याचा प्रयत्न करत होते. आध्यात्मिक उपाय मिळाल्यावर मनाला एक अनामिक ऊर्जा मिळाल्यासारखे जाणवले. त्यामुळे मला भीती किंवा त्रास न जाणवता नामजपातून शक्ती आणि चैतन्य मिळत होते. याविषयी गुरुदेवांप्रती अतिशय कृतज्ञता वाटली. औषधांपेक्षा नामजपादी उपाय गुणकारी आहेत, या नुसत्या जाणिवेने मनाला उभारी मिळत गेली.
३. रुग्णालयात असतांनाही भ्रमणभाषवर समष्टी सेवा केल्याने सेवेतून शक्ती आणि बळ मिळून सकारात्मकता वाढणे
यजमान आणि मला एकाच खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. भगवंताच्या कृपेने रुग्णालयात भ्रमणभाषवरून सेवाही चालू झाली. सेवेतून मला एक प्रकारची शक्ती आणि बळ मिळाले अन् त्या स्थितीतही सकारात्मकता वाढली.
४. रुग्णालयात आध्यात्मिक उपाय भावपूर्ण केल्याने नामजपातील आनंद अनुभवता येऊन रुग्णाईत असतांनाही उत्साह वाढणे
रुग्णालयात भरती झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी आध्यात्मिक उपाय भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी नामजप करतांना शरिरातून पुष्कळ प्रमाणात उष्णता बाहेर पडत आहे, असे मला जाणवत होते. ३ – ४ दिवस मला पुष्कळ अस्वस्थता वाटली. त्यानंतर तिचे प्रमाण न्यून होऊन मला नामजपातील आनंद अनुभवायला मिळाला. त्यानंतर माझा उत्साह वाढला आणि मी रुग्णाईत आहे, असे मला वाटतच नव्हते.
५. रुग्णालयातील कर्मचार्याला साधना सांगणे
रुग्णालयात मी भ्रमणभाषवर सेवेनिमित्त बोलत असायचे. हे पाहून तेथील एका कर्मचार्याने मला सांगितले, काकू, तुम्ही काय करत आहात ? तुम्ही रुग्णाईत आहात. आराम करा. त्या वेळी मी त्यांना साधना सांगितल्यावर ते म्हणाले, सनातन संस्था सांगत असलेली साधना पुष्कळ चांगली आहे.
६. आधुनिक वैद्यांनी कौतुक करणे
सकाळी नियमित आधुनिक वैद्य प्रकृतीची पडताळणी करण्यासाठी यायचे. तेव्हा माझ्याकडे पाहून ते म्हणायचे, काकू, तुम्ही किती आनंदी दिसता. तुमच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की, तुम्ही रुग्णाईत आहात.
७. रुग्णालयात असतांना कोणत्याही वेदना किंवा त्रास न होता साधनेत कोणताही खंड न पडणे
रुग्णालयात मला केवळ एकच गोळी चालू होती. अन्य कोणत्याही वेदना किंवा त्रास मला होत नव्हता. त्या वेळी भगवंता, आम्ही इथे सुरक्षित आहोत, ही केवळ तुझी कृपा आहे, असा विचार येत होता. भगवंत आम्हाला अक्षरशः तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होता. रुग्णालयातून ६ व्या दिवशी आम्ही घरी आलो. आम्हा दोघांना कसलाही त्रास झाला नाही. या कालावधीत सेवा आणि साधना यांमध्ये कोणताही खंड पडला नाही.
या परिस्थितीतही जणूकाही मी एक प्रकारे भगवंताची भेटच अनुभवत होते. त्यासाठी गुरुदेवांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !
– सौ. सुजाता शेट्ये, मुंबई (२५.७.२०२०)
|