परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे…. !

साधकांच्या मनी विराजमान परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘५.१.२०२० या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘देव आपल्यासाठी किती करतो ! तोच आपले सर्वस्व आहे, तर मायेत कशाला अडकायचे ?’ त्या वेळी सुचलेली कविता पुढे दिली आहे.

कु. हर्षाली कदवाने

मायेत कशाला अडकावे ।
अडकायचे तर परात्पर गुरुदेवांमध्ये अडकावे ॥ १ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे अडकणे नव्हे ।
तर परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे मायेपासून दूर रहाणे ॥ २ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
सतत देवाच्या अनुसंधानात रहाणे ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
भावाच्या भावसागरातला आनंद घेणे ॥ ४ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
त्यांच्या समष्टी कार्याशी एकरूप होणे ॥ ५ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढण्याची प्रेरणा मिळणे ॥ ६ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
नकारात्मक विचार न येणे आणि सकारात्मक विचारांमध्ये वाढ होणे ॥ ७ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
‘स्व’ला विसरून इतरांना साहाय्य करणे ॥ ८ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
विचारण्याची आणि ऐकण्याची वृत्ती वाढणे ॥ ९ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे ।
सर्व प्रसंगामध्ये अंतर्मुखता निर्माण होणे ॥ १० ॥

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजेच ।
लवकरात लवकर देवाशी एकरूप होण्याचे प्रयत्न करणे ॥ ११ ॥

‘देवा, मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. देवा मी अल्प पडते. देवा, तूच माझ्याकडून प्रयत्न करवून घेे आणि मला सतत तुझ्या चरणांपाशी मला ठेव.’

– कु. हर्षाली कदवाने (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक