श्री. घनश्याम गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. सेवेची तळमळ
अ. ‘एकदा सांखळी येथील एका शेताची स्वच्छता चालू होती. त्या वेळी ‘जेसीबी’ यंत्राने साफसफाई चालू होती. तेव्हा कडक ऊन असूनही जाधवकाका हातात कोयता घेऊन शेतात साफसफाई करत होते. ते पाहून ‘मलाही त्यांच्या समवेत सेवा करावी’, असे वाटले.
आ. ‘आश्रमाच्या जागेत कोणत्या आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करू शकतो ? त्या झाडांची रोपे किंवा बियाणे कुठे मिळू शकतील ?’, याविषयी जाधवकाका दायित्व घेऊन चौकशी करतात.
२. विचारण्याची वृत्ती आणि अल्प अहं
एखादे सूत्र आश्रमासंदर्भात असल्यास त्याविषयी आश्रमात विचारणा करून नंतरच ते निर्णय घेतात. जाधवकाकांच्या वागण्या-बोलण्यात मला कधीही अहंकार जाणवला नाही. ते नम्रतेने बोलतात.
‘देवाच्या कृपेने मला जाधवकाकांमधील गुण टिपता आले’, त्याविषयी मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
श्री. संतोष पाटणे, सांगोला, जि. सोलापूर
१. ‘श्री. जाधवकाका नेहमी हसतमुख असतात.
२. ते पूर्वी सोलापूरमधील एक ठिकाणचे दायित्व पहात होते. त्यानिमित्ताने माझा त्यांच्याशी नियमित संपर्क असायचा. त्या वेळी मला त्यांच्यातील नियोजनकौशल्य, इतरांना साहाय्य करणे, अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आदी गुण जाणवायचे.
३. मी त्यांना नियोजनातील अथवा वैयक्तिक अडचण सांगितल्यास ते तत्परतेने मार्ग सुचवायचे.
४. माझे अनेक वेळा त्यांच्या घरी (अकलूज येथे) जाणे व्हायचे. तेव्हा त्यांना ‘आमच्यासाठी काय करू नि काय नको?’, असे नेहमी वाटायचे. आम्हाला श्री. जाधव आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा आधार वाटायचा. त्यांनी आम्हाला पुष्कळ प्रेम दिले.’ (८.१०.२०२०)