
‘वर्ष २०१५ मध्ये एकदा मी रहात असलेल्या खोलीतील एका साधकाला भेळ खाण्याची इच्छा झाली आणि त्याने ती माझ्याकडे व्यक्त केली. त्यानंतर मी हा विषय आश्रमातील उत्तरदायी साधकांना सांगितला आणि त्यांना विचारले, ‘‘मी रहात असलेल्या खोलीतील साधकांना आश्रमातून भेळ बनवण्याचे साहित्य मिळू शकते का ?’’ त्यानंतर हा विषय कुणाकडून तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समजला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आश्रमातील सर्वच साधकांसाठी भेळीचे नियोजन करता येईल.’’ त्यानंतर २ दिवसांतच आश्रमातील सर्व साधकांसाठी भेळीचे नियोजन करण्यात आले.

या प्रसंगानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘गुरूंना ‘गुरुमाऊली’, असेही म्हणतात. माऊली कुटुंबातील सर्वांवर प्रेम करते आणि त्यांचे लाडही करते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरही सर्व साधकांवर माऊलीसारखे प्रेम करतात.’ त्या वेळी माझ्याकडून गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२३)