‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या साक्षात् देवी आहेत’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. नामजप करतांना वाईट शक्तीने साधिकेवर त्रासदायक शक्ती सोडणे आणि साधिकेने सूक्ष्मातून वाईट शक्तीवर चांगली शक्ती सोडून तिच्याशी लढत रहाणे 

‘४.१२.२०२३ या दिवशी रात्री ११ वाजता मी खोलीत डोळे मिटून नामजप करत असतांना मला एका मोठ्या वाईट शक्तीचा केवळ चेहरा दिसत होता. वाईट शक्ती तिच्या तोंडातून माझ्यावर काळी (त्रासदायक) शक्ती सोडत होती. त्या वेळी मीसुद्धा सूक्ष्मातून फुंकर मारून वाईट शक्तीवर चांगली शक्ती सोडत होते. मी स्थुलातून कोणतीही हालचाल करत नव्हते. मी न घाबरता वाईट शक्तीशी सूक्ष्मातून लढत होते. त्या वाईट शक्तीपुढे माझी शक्ती न्यून पडत होती.

सुश्री (कु.) महानंदा पाटील

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपाने वाईट शक्तीला नष्ट करणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे रूप अंतर्धान पावणे  

मी वाईट शक्तीशी सूक्ष्मातून लढत असतांना मनात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रूप दिसले.  त्या फुंकर मारून वाईट शक्तीवर मारक शक्ती सोडून तिच्याशी लढत होत्या. काही वेळाने वाईट शक्तीचा चेहरा नष्ट झाला आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे रूप अंतर्धान पावले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ वाईट शक्तीवर मारक शक्ती सोडत असतांना जाणवलेली सूत्रे

अ. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ या देवी आहेत.

आ. वाईट शक्ती माझ्यावर मारक शक्ती सोडत असतांना देवीला समजले आणि देवीने क्षणार्धात येऊन मला संकटातून सोडवले.

इ. ‘भक्त संकटात असल्यावर देवता भक्ताला संकटातून सोडवण्यासाठी धावून येतात’, हे मी अनुभवले.

४. वाईट शक्तीने त्रासदायक शक्ती सोडल्यामुळे साधिकेला झोप न लागणे; परंतु श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून लढून वाईट शक्तीला नष्ट केल्यावर साधिकेला झोप लागणे  

आरंभी मला झोप लागत नव्हती. मी नामजप केल्यावर काही वेळाने मला झोप लागली. मी सकाळी ६ वाजता उठल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटत होता. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘रात्री वाईट शक्तीने त्रासदायक शक्ती सोडल्यामुळे खोलीतील वातावरण पालटले होते; म्हणून मला झोप येत नव्हती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून लढून वाईट शक्तीला नष्ट केले. त्यामुळे वातावरणात चैतन्य पसरले आणि मला झोप लागली.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आपणच मला आध्यात्मिक त्रासातून मुक्त करून माझे रक्षण केलेत’, त्याबद्दल आपल्या चरणी  कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१२.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक