स्वतःच्या कृतीतून प्रीती शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधनेत साधकाचा मुख्य गुणधर्म म्हणजे आज्ञापालन असे सांगितले जाते. आज आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची हे पुढील प्रसंगातून माझ्या लक्षात आले. प्रसंग असा झाला. प्रकृती ठीक नसल्यामुळे मी विशेष काही खाऊ शकत नाही. काही खायच्या ऐवजी मी फक्त पितो आणि तेही दिवसाच्या ठराविक वेळी, उदा. सकाळी ८.३०, दु. १२, दु. ४ आणि रात्री ८. आज कु. करुणा मुळे हिने सकाळी ११ वाजता १ पेलाभर कलिंगडाचा रस प्यायला आणला. मी तिला म्हणालो, आता हा रस आणला आहेस, तर दुपारी १२ वाजता प्यायला काही आणू नकोस. त्यावर ती म्हणाली, हा थोडाच आहे. पाण्यासारखा प्या. दुपारचे १२ ऐवजी १ वाजता आणीन. अशा आशयाचे ती २ – ३ वेळा इतक्या प्रेमाने म्हणाली की, मला तिचे ऐकावेच लागले ! यावरून माझ्या लक्षात आले, आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्याचदा नाईलाजाने ऐकावे लागते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले