स्वीकारण्याची वृत्ती, सहजता, सेवेसाठी तत्पर असलेले आणि इतरांचा विचार करणारे श्री. निरंजन चोडणकर!

श्री. निरंजन चोडणकर

१. नम्रता

‘निरंजनदादा सर्वांशी आदराने आणि नम्रतेने बोलतो. तो कुणालाही ‘लहान-मोठा’, असे मानत नाही.

कु. अमृता मुद्गल

२. प्रेमभाव

मी त्याला ३ वर्षांपासून राखी बांधते. तो मला खाऊ, भेटवस्तू आणि साधनेसाठी ध्येय देतो.

३. सेवेसाठी तत्पर

अ. त्याला सेवेसाठी विचारल्यावर तो नकार देत नाही. तो सेवा करण्यास नेहमी तत्पर असतो.

आ. तो शौर्य जागृती वर्ग घेतांना सर्वांना आनंद देतो आणि त्यांना घडवतो.

४. तत्त्वनिष्ठ

तो मला साधनेत मला पुष्कळ साहाय्य करतो. तो मला तत्त्वनिष्ठतेने चुका सांगतो.

५. स्वीकारण्याची वृत्ती

एकदा मी दादाला त्याची चूक सांगितली. तेव्हा त्याने ती स्वीकारली आणि कान पकडून माझी क्षमा मागितली. तो मला म्हणाला, ‘‘ताई, क्षमा कर. यापुढे असे होणार नाही. मी प्रायश्‍चित्त घेतो.’’ तेव्हा ‘शिष्य गुरूंकडे जशी क्षमा मागतो, तशी क्षमायाचना दादा करत आहे’, असे मला वाटले आणि माझा भाव जागृत झाला.

६. संतांनी कौतुक करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निरंजनदादाचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘निरंजन म्हणजे आधार आहे. तो सर्वांचा भार उचलणारा आहे.’’ ‘त्याने गुरूंचा विश्‍वास संपादन केला आहे’, असे मला वाटते.

७. गुरुंप्रती भाव

अ. ‘माझ्या आयुष्यात जे काही आहे, ते गुरूंचे आहे. मी केवळ त्यांच्या कृपेमुळेे जगत आहे’, असे तो म्हणतो. ‘गुरूंनी आपल्याला स्वीकारावे’, असे आपल्याला वाटत असेल, तर ‘आपण गुरूंसाठी सर्वकाही करायला पाहिजे’, असे त्याला वाटते.

७ आ. ‘गुरु आईची काळजी घेणार’, असे सांगणे

मी : दादा, आईची काळजी घेतो ना ? तिला साहाय्य करतो ना ?

दादा : देव सर्वांची काळजी घेणारा आहे. मी माझे कर्तव्य करतो. अमृता, मला गुरु हवे आहेत. आईने मला जन्म दिला आहे; पण माझा सांभाळ देवाने केला आहे आणि देवानेच मला शिकवले आहे. मी देवासाठीच सर्व करणार आहे.

८. त्याच्यात सहजता, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, दायित्व घेणे, प्रांजळपणा, निरपेक्षता, क्षात्रवृत्ती आणि शरणागतभाव हे गुण आहेत.

९. ‘निरंजन’ नावाचा देवाने सुचवलेला भावार्थ

नि – निरंतर साधना करणारा

रं – गुरु सेवेत रत असणारा (गुरूंचा रत्न होण्यास प्रयत्न करणारा)

ज – जिवाची बाजी लावून साधकांना शिकवणारा

न – नामाशी एकरूप होणारा

– कु. अमृता मुद्गल (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक