खराडी (पुणे) येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू सोहळा !

हळदीकुंकू सोहळ्यात सहभागी सुवासिनी महिला

पुणे – ‘गुलमोहर पार्क व्ह्यू’, खराडी येथील महिला मंडळाने संक्रांतीनिमित्त भव्य हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन केले होते. श्री महालक्ष्मीदेवीची स्थापना करून देवीसमोर पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू करण्यात आले. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत आनंदमय वातावरणात सहभागी होऊन सण साजरा केला. विविध खेळ, गीते आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून हा सोहळा विशेष पद्धतीने साजरा झाला. कॉस्मोपॉलिटीयन (विविध धर्माच्या लोकांचा समूह) जीवनशैलीतही संस्कृती जपण्याचा आणि सण साजरे करण्याचा संदेश देत महिलांनी एकत्र येण्याचे आदर्श उदाहरण समोर ठेवले. हा सोहळा अधिक रंगतदार करण्यासाठी येथे उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.