गोवा – मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही चर्चा झाली. बैठकीत अनेक मंत्र्यांनी या प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाचे सूत्र मांडले. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या प्रकल्पांविषयी केंद्राशी समन्वय करून अपेक्षित निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रीमंडळाने मला दिलेले आहेत. याविषयी केंद्राकडे वेळोवेळी समन्वय केला जात आहे. राज्यातील कोळसा वाहतुकीत निम्म्याने घट केली जाणार आहे. मुरगाव बंदरातून कोळशाऐवजी अन्य वस्तूंची वाहतूक करता येऊ शकते का, याविषयी विचारविनियम केला जात आहे. बंदरातील कोळसा वाहतूक एकाच वेळी बंद करता येणार नाही. ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’वर दीड सहस्र कुटुंबे आणि ४ सहस्र ५०० निवृत्तीवेतनधारक अवलंबून आहेत. याविषयी मी ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि केंद्रीय जलवाहतूक मंत्री मंडवीया यांच्याशी चर्चा केली आहे. राज्याला ४०० केव्हीए क्षमतेच्या तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाची आवश्यकता आहे.’’
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > राज्यातील कोळसा वाहतूक निम्म्याने घटवणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
राज्यातील कोळसा वाहतूक निम्म्याने घटवणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नूतन लेख
- उत्सवांमुळे जलप्रदूषण : केवळ एक अपप्रचार ?
- प्रशासनाचा विरोध डावलून गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यातच केले विसर्जन !
- संपादकीय : कर्नाटक शासनाचा गणेशद्रोह !
- Shri Ramlalla Darshan : ६ महिन्यांत ११ कोटी भाविकांनी घेतले श्री रामललाचे दर्शन !
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !
- ऑगस्टमध्ये एस्.टी. महामंडळ प्रथमच १६.८६ कोटी रुपयाने लाभात !