Pakistan Punjab Kite Flying Banned : पाकमधील पंजाब प्रांतात पतंग उडवल्यास ५ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा संमत

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेने पतंगाविषयी एक विधेयक संमत केले आहे. यानुसार पतंग उडवतांना पकडल्यास ३ ते ५ वर्षे कारावास किंवा २० लाख पाकिस्तानी रुपये (६ लाख भारतीय रुपये) दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा होऊ शकते. पतंग बनवणार्‍या आणि त्याची विक्री करणार्‍यांना ५ ते ७ वर्षे कारावास किंवा ५० लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दंड न भरल्यास २ वर्षांची अतिरिक्त शिक्षा होऊ शकते.

१. अल्पवयीन मुलांंना पहिल्या गुन्ह्यासाठी ५० सहस्र रुपये आणि दुसर्‍या गुन्ह्यासाठी १ लाख रुपये दंड ठोठावला जाईल. तिसर्‍यांदा गुन्हा केल्यास वर्ष २०१८ च्या बाल न्याय कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल.

२. हा कायदा सर्व प्रकारच्या धाग्यांनी बनवलेल्या पतंगांना लागू होतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंजाब सरकारने पतंग बनवणे, उडवणे आणि विकणे हा अजामीनपात्र गुन्हा घोषित केला होता.