पकडण्यात आलेले बहुतांश गुन्हेगार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बेकायदेशीररित्या देशात रहाणार्यांना हाकलण्याची घोषणा केल्यावर अवघ्या २४ घंट्यांत ३०८ जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी बहुतांश लोक गुन्हेगार आहेत. त्यांतील काहींवर अपहरण, खून आणि बलात्कार केल्याचे आरोप आहेत. अमेरिकेत ७ लाखांहून अधिक लोक बेकायदेशीररित्या रहात आहेत.
अमेरिकेत सर्वाधिक स्थलांतरित लोक
‘प्यू रिसर्च सेंटर’च्या मते अमेरिकेत जगातील सर्वाधिक स्थलांतरित आहेत. जगातील एकूण २० टक्के स्थलांतरित अमेरिकेत रहातात. वर्ष २०२३ पर्यंत येथे रहाणार्या एकूण स्थलांतरितांची संख्या ४ कोटी ७८ लाख इतकी होती. ‘इतर देशांतील लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करून गुन्हे करतात’, असे ट्रम्प यांचे मत आहे.