TN Police Prevent Animal Sacrifice : तमिळनाडूतील हिंदूंच्या पवित्र टेकडीवर मुसलमानांकडून प्राण्यांचा बळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला !

हिंदु संघटनांच्या विरोधाचा परिणाम  

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील तिरुपरंकुंद्रम् जिल्ह्यातील पवित्र मदुराई टेकडीवर प्राण्यांची कुर्बानी देण्याचा मुसलमानांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हिंदु संघटनांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मदुराई टेकडीवर प्राण्यांचा बळी देणार होते. (आता या राजकीय पक्षावरही बंदी घालणे आवश्यक झाले आहे, हेच या घटनेतून लक्षात येते ! – संपादक) या टेकडीवर हिंदूंचे मुरुगन मंदिर असून त्याच परिसरात सिकंदर बदुशाह (बादशाह) दर्गाही आहे. तेथेही बळी दिला जाणार होता.

१. हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे मदुराई जिल्हा अध्यक्ष सोलाईकन्नन यांनी आयुक्त लोगानाथन् यांना याबद्दल माहिती दिली होती आणि बळी देणे थांबवण्याची लेखी मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मुसलमानांना बकरे आणि कोंबड्या यांचा बळी देण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, या दर्ग्यात केवळ नमाजपठण किंवा प्रार्थनाच करता येते. कोणताही बळी देता येत नाही.

२. गेल्या आठवड्यात इस्लामी संघटनांशी संबंधित लोकांनी महसूल अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांची भेट घेतली. त्यांनी सिकंदर बदुशाह दर्ग्यात बळी (कुर्बानी) देण्याची अनुमती मागितली; परंतु मदुराई जिल्हा प्रशासनाने दर्ग्यात केवळ नमाजपठण करण्याची परवानगी दिली.

३. हिंदूंचे म्हणणे आहे की, मदुराई टेकडीवरील मंदिर हे भगवान मुरुगनच्या ६ पवित्र निवासस्थानांपैकी एक आहे. मुसलमान या मंदिराची विटंबना करू इच्छितात आणि त्याला इस्लामी स्वरूप देऊ इच्छितात.

४. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, काही लोक तिरुपारंकुंद्रम टेकडीला ‘सिकंदर मलाई (टेकडी)’ म्हणत आहेत.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूतील पोलीस हिंदूंसाठी इतके तत्पर होणे, ही अभिनंदनाचीच गोष्ट म्हणावी लागेल !

  • तमिळनाडू : प्राचीन पवित्र तिरुपारंकुंद्रम् टेकडीचे ‘सिकंदर टेकडी’त रूपांतर करण्याचे षड्यंत्र

  • टेकडीवर मुसलमान खासदाराकडून मांसाहारी बिर्याणी खाण्याची घटना

तिरुपारंकुंद्रम् टेकडीवरील दर्गा

चेन्नई (तमिळनाडू) – गेल्या काही महिन्यांपासून पवित्र तिरुपारंकुंद्रम् टेकडीचे इस्लामी ‘सिकंदर टेकडी’त रूपांतर करण्याचा प्रयत्न उघड आणि गुप्त अशा दोन्ही प्रकारे करत आहेत. मुसलमानांनी टेकडीच्या वर दर्गा बांधला आहे. दर्ग्यातील वास्तूकला आणि खांब यांवरून स्पष्टपणे दिसून येते की, ते हिंदु मंदिर होते आणि आता त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. राज्यातील रामनाथपूरम् जिल्ह्यातील खासदार नवाझ कानी यांनी अलीकडेच त्या ठिकाणी भेट दिली आणि टेकडीवर इतरांसह मांसाहारी बिर्याणी खाल्ली.

तिरुपारंकुंद्रम् टेकडीवर रामनाथपूरम् जिल्ह्यातील खासदार नवाझ कानी इतरांसह मांसाहारी बिर्याणी खातांना

टेकडी हिंदूंची असल्याचा न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाला सरकारचेही समर्थन

दर्ग्याच्या खांबांवरील हिंदु वास्तूकला

‘ही टेकडी हिंदु मंदिराची आहे’, असा न्यायालयाचा आदेश असूनही त्यांनी या पवित्र ठिकाणी अतिक्रमण केले आहे आणि द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारनेही या उल्लंघटनास अनुमती दिली आहे. तमिळनाडूच्या कोणत्याही राजकारण्याने याबद्दल चिंता व्यक्त केलेली नाही. १८ फेब्रुवारीला मुसलमान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेळावा घेण्याची योजना आखत आहेत.

दर्ग्याच्या खांबांवरील हिंदु वास्तूकला पुसून टाकण्यात आली !

हिंदु संघटनांचा विरोध

भारत हिंदु मुन्नानीचे संस्थापक आर्.डी. प्रभु हे या कृत्याचा निषेध केला असून सर्व हिंदूंच्या ही घटना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनीही याविरुद्ध आवाज उठवला आहे. तमिळनाडूतील भाजपचे नेते श्री. राधाकृष्णन् यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर निषेध व्यक्त केला आहे.

वर्ष १८५८ मध्ये तिरुपारंकुंद्रम् टेकडीवर दर्गा नव्हता, हे दर्शवणारे छायाचित्र

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे बलपूर्वक कह्यात घेऊन तेथे मशिदी बांधल्या, हा इतिहास असतांना वर्तमानातही त्यांचे वंशज याहून वेगळे काही करत नाहीत, हे लक्षात घेता आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक झाले आहे !