सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार प्रसंग मनात न ठेवता त्याविषयी मनमोकळेपणाने विचारल्याने त्या प्रसंगाविषयीचे विचार दूर होणे 

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘१४.४.२०२० च्या सकाळी १० वाजता मी स्वयंपाकघरात भाजी निवडण्याची सेवा करत होते. तेव्हा सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणार्‍या उत्तरदायी साधिकेने येऊन मला विचारले, ‘‘अत्तराच्या बाटल्या ठेवलेल्या मांडणीवर अष्टगंधाच्या बाटल्या ठेवलेले खोके ठेवू का ?’’ मी ‘हो’, असे म्हणाले. त्यानंतर मी सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करण्यासाठी दुपारी ४.३० वाजता गेले. तेव्हा अत्तर मांडणीवरील साहित्याचे खोके एका खणातून काढून तिसर्‍या खणात ठेवलेले दिसले. ते पाहून मला क्षणभर राग आला. मला वाटले, ‘मला तर विचारले, ‘सिद्ध खोके ठेऊ का ?’ आणि ‘साहित्याचे खोके काढून ठेवणार आहेत’, हे मला सांगितले नाही.

कु. महानंदा पाटील

साधकांनी उलथापालथ करून सर्व अव्यवस्थित केले होते. खोक्यांवर लावलेल्या ‘लेबल’ची बाजू मागच्या बाजूला गेली होती. त्यामुळे खोके शोधावे लागत होते; पण मी शांत राहिले. त्यानंतर ५ मिनिटांनी उत्तरदायी साधिका आल्या. मी त्यांना विचारले, ‘‘असे सर्व कुणी केले ? ‘लेबल’ दिसत नसल्यामुळे खोकी शोधावी लागत आहेत.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मीच ते सरकवले; पण मी खोकी ‘लेबल’ दिसतील, अशा पद्धतीनेच ठेवली होती. त्यानंतर एका काकांनी त्याची हलवाहलव केली आहे’, असे वाटते.’’ तेव्हा माझ्या मनातील राग क्षणात निघून गेला.

मी वरील प्रसंग मनात न ठेवता मनमोकळेपणाने ‘खोके कुणी सरकवले ?’, हे विचारल्याने लगेच त्या प्रसंगाविषयीचे विचार दूर झाले, तर किती बरे वाटले. हे त्या वेळी माझ्या लक्षात आले.

त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता उत्तरदायी साधकांचा सत्संग झाला. तेव्हा मी हा प्रसंग सांगून माझ्या मनाची विचारप्रक्रिया सांगितली. माझ्या मनाची स्थिती सांगून मी क्षमाही मागितली. मला राग आल्याने मी क्षमा मागितली. तेव्हा ‘मला पुष्कळ बरे वाटले’, याची मला जाणीव झाली.

सद्गुरु राजेंद्र शिंदे माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्याचा मला लाभ होत आहे. त्यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितले, ‘‘मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि चूक झाल्यास क्षमा मागितली पाहिजे.’’ त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी साधनेच्या दिशेने जात आहे. मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक