संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !

योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा यांनी देहली विद्यापिठामध्ये एका कार्यक्रमात ‘मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल’, असे अतिशय स्पष्टच विधान केले; मात्र त्यामुळे जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना झोंबले नसते, तरच नवल होते. बर्‍याच कालावधीनंतर या निमित्ताने पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्रा’चा विषय चर्चेत आला आहे. अर्थातच तो सतत चर्चेत येणेही आवश्यक आहे. त्यामुळे चर्वितचर्वण होऊन, त्यातून वैचारिक घुसळण होऊन सर्व स्तरांवर जागृती होण्यास आरंभ होईल. त्यामुळे योगऋषी रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घातला, ते चांगलेच झाले. हिंदु राष्ट्राचा विषय कुठेही चर्चिला गेला की, काही (जन्म)हिंदूच लगेच नेहमीचा प्रश्न विचारतात, ‘हिंदु राष्ट्रात मुसलमान कुठे जाणार ?’ जगभरातील अन्य धर्मियांच्या सर्व देशांत हिंदु रहातात ना ? तसे येथे मुसलमान का राहू शकत नाहीत ? ही एकदम साधी गोष्ट आहे. जगातील प्रत्येक देशाने त्याचा एक धर्म घोषित केलेला आहे; कारण भारत सोडून कुठलाही देश स्वतःला निधर्मी म्हणवून घेत नाही. आज भारतातीलच काय, विदेशातील मुसलमानही सांगतात की, भारत हे मुसलमानांसाठी सर्वांत सुरक्षित राष्ट्र आहे; म्हणून तर कोट्यवधी बांगलादेशी येथे सुखनैव नांदत आहेत. जगातील बर्‍याच मुसलमान राष्ट्रांत काही ना काही युद्धे, अराजक असे चालू असते. चीनमध्ये मुसलमानांवर कडक निर्बंध आहेत. भारतात तसे काही नाही. भारतात शरीयत कायदा लागू नाही. त्यामुळे येथे सर्वांसमोर चाबकाने फोडणे, फाशी देणे, शिरच्छेद करणे अशा कुठल्याही भयानक शिक्षा मुसलमानांना नाहीत; उलट आतापर्यंत विविध प्रकारच्या अनेक सवलती भोगून त्यांनी हिंदूंना अक्षरशः लुबाडले आहे. मग या सर्व सवलती बंद होतील, याची भीती मुसलमानांना आहे का ?

निधर्मी आणि मुसलमान यांना प्रश्न !

निधर्मी वृत्तीच्या हिंदूंनी स्वतःला आणि मुसलमानांना हे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली, तेव्हा सर्व मुसलमानांनी तिथे जाणे आवश्यक होते; कारण मुसलमानांसाठी दिलेले ते मुसलमान राष्ट्र होते; असे जर आहे, तर उरलेले राष्ट्र हे हिंदु राष्ट्र का नाही ? ‘नेहरूंनी केलेली चूक आता सुधारण्याची वेळ आली आहे’, असे हिंदूंना वाटले, तर त्यात काय चूक आहे ? सहस्रो वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी कुठले अन्य पंथीय किंवा धर्मीय यांच्यावर कधी अत्याचार केला आहे, असे एक तरी उदाहरण आहे का ? ‘काफिरांना (म्हणजे मुसलमान सोडून अन्य सर्वांना) मारा’ असे कुराण सांगते आणि हिंदु धर्म ‘वसुधैवकुटुम्बकम् ।’चा (संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब असल्याचा) घोष करतो. येथे पारशी आले, ज्यू आले, अगदी इराणीही आले. सर्व येऊन येथे स्थिरस्थावर झाले. मुसलमान आणि ख्रिस्ती आले. या दोघांनी हिंदू आणि हिंदु संस्कृती संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला अन् आजही करत अाहेत. त्यांचे अनुयायी हिंदूंच्या नाकावर टिच्चून भारतात रहात आहेत आणि हिंदूंच्या डोक्यावर बसले आहेत. काही तर हिंदूंना अक्षरशः ओरबाडत आहेत, लुटत आहेत, त्यांचा वंशविच्छेद करत आहेत; तरीही अद्याप हिंदूंचा अपेक्षित धाक निर्माण झालेला नाही आणि हिंदूंचे सरकारही हे सर्व बर्‍यापैकी चालू देत आहे; मग हिंदूंना किंवा त्यांच्या हिंदु राष्ट्राला घाबरण्याचे कारणच काय ? कदाचित् ‘हिंदु राष्ट्र आल्यावर हे सर्व बंद पडेल’, ही त्यांना भीती वाटते का ? जे १५ मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करतात, जे वर्ष २०४७ मध्ये भारताला ‘खुरासान’ (इस्लामिक राष्ट्र) बनवण्याचे नियोजन करतात, त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना कुणीही एका चकार शब्दाने प्रश्न विचारत नाही. ‘हिंदु राष्ट्र आल्यावर काय होईल ?’ याची खोटी भीती पसरवण्यापेक्षा जिहाद्यांनी नियोजन केल्याप्रमाणे ‘इस्लामी राष्ट्र’ आले, तर काय होईल ? हा प्रश्न निधर्मी हिंदूंना का पडत नाही ? इस्लामी राष्ट्र आले, तर वर्ष १९९० मध्ये जे काश्मीरमध्ये झाले, जे गेली काही वर्षे बंगालमध्ये झाले आहे, ते संपूर्ण भारतभर होईल आणि ते होऊ नये म्हणून ‘हिंदूंना हिंदु राष्ट्र हवे आहे’, असे हिंदूंनी म्हटले, तर त्यात काय चूक आहे ? योगऋषी रामदेवबाबा हिंदु राष्ट्राविषयी बोलले म्हणून त्यांना विरोध करणारे मुसलमान अन् काँग्रेसी यांनी हे लक्षात घ्यावे.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

अणूबाँबची निर्मिती करणारे जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी म्हटले होते की, जगातील पहिली क्रांती अणूबाँबने केली, तर दुसरी भगवद्गीता करील. आज योग आणि आयुर्वेद यांचे महत्त्व सांगणारे विदेशातील मुसलमानांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. हिंदूंचा आयुर्वेद घेऊन त्याची उत्पादने बनवून त्याला ‘हलाल’ म्हणून विकायला मुसलमानांना आयुर्वेदाचा आधार हवा आहे; पण हिंदु धर्म किंवा हिंदु राष्ट्र नको. हिंदु राष्ट्राची भूमिका बौद्धिक किंवा वैचारिक स्तरावरही समजून घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र ही संकल्पना राजकीय नाही. ती आदर्श राष्ट्राची संकल्पना आहे. भ्रष्टाचारविरहित, असुविधांविरहित, बेरोजगारी आणि दारिद्र्यविरहित अशी गुण्यागोविंदाने रहाणार्‍या जनतेच्या राष्ट्राची ही संकल्पना आहे. मुसलमानांना शांततेचे राष्ट्र नको आहे का ? कि पिढ्यान्‌पिढ्या केवळ जिहादचे युद्ध करत घालवायच्या आहेत ?, हा विचार स्वतःला सुधारित म्हणवून घेणार्‍या मुसलमानांनी करण्याची हीच वेळ आहे. आज अफगाणिस्तानसह असंख्य मुसलमान हे मान्य करत आहेत की, त्यांचे पूर्वज सनातनी वैदिक हिंदूच आहेत. आज विदेशातील सहस्रो मुसलमान त्यांच्या धर्माचा त्याग करून ते धर्मरहित झाले आहेत, हे वास्तव आहे. अमेरिकेत २३ टक्के मुसलमान आज ‘इस्लाम’ पाळत नाहीत. युनायटेड किंगडममध्ये प्रतिवर्षी १ लाख लोक इस्लाम सोडत आहेत. ‘माजी-मुसलमान’ होण्याची नवरूढी जगातील अनेक देशांत वाढत चालली आहे. असे असूनही दुसर्‍या बाजूला भारतासह जगभरात मुसलमान लोकसंख्येच्या विस्फोटाची आकडेवारीही इतकी भयानक आहे की, सजग हिंदूंच्या छातीत धडकी भरल्याविना रहात नाही. वर्ष २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९८० कोटी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २८० कोटी (३० टक्के) होईल, असा अंदाज आहे. भारतातही ती ३० टक्के होईल आणि भारत जगातील सर्वाधिक मुसलमान असलेला देश होईल. मुसलमान जिथे वाढतात, तिथून हिंदूंना पलायन करण्याविना पर्याय रहात नाही; कारण ते विविध प्रकारचे जिहाद करून काफिरांचा वंशविच्छेद करतात. त्यामुळे त्यांना नियंत्रणात ठेवण्यास सक्षम राष्ट्र नसेल, तर हिंदूंना पळून जाण्यास दुसरे हिंदु राष्ट्रही उपलब्ध नाही. त्यामुळे योगऋषी रामदेवबाबा यांच्या वक्तव्यानंतर मुसलमानांच्या विविध नेत्यांनी कितीही आरडाओरडा केला, तरी त्याचा बिनतोड वैचारिक प्रतिवाद आणि चर्चा प्रत्येक हिंदूने करत रहाणे आवश्यक बनते; कारण अंतिमतः तो त्याच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न होणार आहे !

हिंदु राष्ट्र्र ही भ्रष्टाचारविरहित, दारिद्र्यविरहित आणि गुण्यागोविंदाने रहाणार्‍या जनतेच्या राष्ट्राची संकल्पना !