
चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘‘फाळणीनंतर भारतात रहाण्याचा निर्णय घेऊन भारतीय मुसलमानांनी आपल्या देशभक्तीचा पुरावा आधीच दिला आहे.’’ इम्तियाज अली यांचा हा दावा वस्तूस्थितीच्या पूर्णपणे विपरीत आहे.
सध्याच्या भारतातील मुसलमानांच्या पूर्वजांनी स्वेच्छेने भारतात रहाण्याचा निर्णय घेतला नव्हता, तर तत्कालीन परिस्थिती आणि स्थलांतर करण्यातील व्यावहारिक अडचणी यांमुळे ते येथे राहिले. फाळणीच्या प्रश्नावर लढल्या गेलेल्या वर्ष १९४६ च्या निवडणुकांमध्ये सध्याच्या भारतातील मुसलमानबहुल मतदारसंघांमध्ये ‘मुस्लीम लीग’ला प्रचंड बहुमताने मतदान झाले. या मतदानातून त्या मुसलमानांनी पाकिस्तानला ‘मदिना’प्रमाणे निर्माण केले. त्यांना ही आशा होती की, ज्याप्रमाणे महंमद पैगंबर यांनी मक्केवर स्वारी केली, त्याप्रमाणे भविष्यात पाकिस्तान भारतावर विजय मिळवेल, येथील मुसलमानांची हिंदु सत्तेतून मुक्तता करील आणि या भारतीय उपखंडात इस्लामचा विजय होईल.
हिंदु समाजाला या गोष्टी माहिती नसतात. त्यांना इतिहासाचे योग्य भान नसते आणि शत्रूबोधही नसतो. त्यामुळे ‘गंगा-जमनी तहजीब’चा भाईचारा दाखवून त्यांचा ‘चारा’ कधी झाला, हेच हिंदूंना लक्षात येत नाही.
– श्री. भरत आमदापुरे, अभियंता आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, पुणे. (१३.७.२०२६)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !