ब्रिटन वर्ष २०३० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी घालण्याची शक्यता

भारत अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या दिशेने विचार करत आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आता भारतानेही युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढच्या आठवड्यात एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी वर्ष २०३० पर्यंत देशातील पेट्रोल आणि डिझेल यांवर चालणार्‍या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय ते घेऊ शकतात, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

यापूर्वी वर्ष २०३५ पर्यंत अशी बंदी घालण्याची योजना होती; मात्र त्यातील आणखी ५ वर्षे अल्प करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या गाड्या बंद झाल्यावर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे; मात्र सध्या ब्रिटनमध्ये या गाड्या महाग असल्याने त्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारला यासाठी जागरूकता निर्माण करावी लागणार आहे.