इयत्ता १० वीच्या परीक्षेत सनातनचे साधक, हिंतचिंतक आणि धर्मप्रेमी विद्यार्थ्यांचे सुयश !

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

मुंबई आणि नवी मुंबई

मुलुंड येथील कु. राजसी मंदार गाडगीळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले आहेत. तिला संस्कृत विषयामध्ये ९९ गुण मिळाले आहेत. ‘मी प्रतिदिन नामजप आणि स्तोत्र म्हणत होते. परीक्षेला जाण्याआधी देवाला नमस्कार करत असे. ईश्वराच्या कृपेमुळे मला हे यश मिळाले आहे’, असे तिने सांगितले.

कु. सायली जोशी

वाशी (नवी मुंबई) येथील कु. सायली किरण जोशी हिला ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत.

कु. चैत्राली मेस्त्री

भांडुप येथील कु. चैत्राली प्रमोद मेस्त्री हिला ८६ टक्के गुण मिळाले आहेत. ती संगणकावर टंकलेखन, तसेच सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रसार करण्याची सेवा करते. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातही ती सहभागी होते.

कु. आर्या महाजन

कुर्ला येथील कु. आर्या आनंद महाजन हिला ८४ टक्के गुण मिळाले असून ती धर्मशिक्षणवर्गाची सिद्धता, तसेच अन्य प्रासंगिक सेवेत सहभागी होते.

कु. अक्षता भारती

चेंबूर येथील कु. अक्षता गणपत भारती ही ८०.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तीही प्रासंगिक सेवेत सहभागी होते.

कु. संस्कृती धुमाळ

कोपरखैरणे येथील कु. संस्कृती जगन्नाथ धुमाळ हिला ८०.४० टक्के गुण मिळाले आहेत. दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू असलेले ‘ऑनलाईन’ सत्संग ती नियमितपणे ऐकत आहे.

ठाणे  

डोंबिवली (पूर्व) येथील कु. प्रथमेश शंकर कदम याला ८१.२० टक्के गुण मिळाले असून त्याने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने हे यश मिळाले’, असे सांगितले. तो अभ्यासाला बसण्यापूर्वी प्रार्थना आणि गणपतीचा नामजप करायचा. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढली आणि अभ्यासाचा कंटाळा आला नाही.

कु. ऋतुजा गिते

ठाणे येथील कु. ऋतुजा संजय गिते हिला ८७ टक्के गुण मिळाले आहेत. ‘नामजपाच्या जोडीला अत्तर-कापूर यांचे आध्यात्मिक उपाय करणे या सर्वांचा मन एकाग्र होण्यासाठी लाभ झाला’, असे तिने सांगितले. ती धर्मशिक्षणवर्गात नेहमी उपस्थित असायची.

कु. सिद्धार्थ देवघरे

ठाणे येथील कु. सिद्धार्थ संजय देवघरे याला ८७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. अभ्यासाला बसण्याआधी आणि पेपर लिहिण्यापूर्वी तो प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करत असे. नामजप, आत्मनिवेदन आणि गुरुचरणांचे स्मरण करणे यांमुळे हे यश प्राप्त झाल्याचे त्याने सांगितले.

कु. तीर्था देवघरे

ठाणे येथील कु. तीर्था संजय देवघरे हिला ८१ टक्के गुण मिळाले. अभ्यासाला बसायच्या आधी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करून ती श्रीकृष्णाचे चित्र किंवा परात्पर गुरुदेवांचा विशेषांक जवळ ठेवत असे. नामजप, आत्मनिवेदन आणि गुरुचरणांचे स्मरण करणे यांमुळे हे यश प्राप्त झाल्याचे तिने सांगितले.

जळगाव  

कु. अभिजित जाधव

जळगाव येथील कु. अभिजित विजय जाधव याला ९५.६० टक्के गुण मिळाले आहेत. यशाविषयी सांगतांना तो म्हणाला, ‘‘जे यश संपादन झाले, ते गुरुकृपेमुळेच ! श्री गणेशाची नियमित उपासना केल्यामुळे हे शक्य झाले. मला नेहमी समजून घेऊन मार्गदर्शन करणारे माझे पालक आणि सतत साधनेची आठवण करून देणारे माझे वडील यांच्यामुळेही हे शक्य झाले. मी सर्वांच्या चरणी कृतज्ञ आहे.’’

कु. रितेश पाटील

जामनेर येथील कु. रितेश प्रमोद पाटील याला ८७.२० टक्के गुण मिळाले आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये मानस नामजप लिहून मग तो उत्तरपत्रिका सोडवायला घ्यायचा.

गडचिरोली येथील कु. प्रज्वल वझाडे याचे इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील सुयश !

कु. प्रज्वल वझाडे

गडचिरोली येथील कु. प्रज्वल वझाडे याला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ८२.४६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. नामजपादी उपायांमुळे अभ्यासाच्या ताणावर त्याला मात करता आली. कु. प्रज्वल याने या यशाचे श्रेय श्रीकृष्ण, श्री गणेश आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना अर्पण केले आहे.