पणजी – गोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. सर्व आमदारांनी जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी सिद्धता दर्शवली आहे. साहित्य खरेदी करण्यासाठी सर्वांनी घरून बाहेर पडू नये आणि बाहेर पडल्यास सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. लोकांनी घरीच थांबावे. पुढील ८-१० दिवसांत काय परिस्थिती निर्माण होईल, हे आता सांगता येणार नाही. सर्वांनी सावधगिरी पाळणे अत्यंत आवश्यक आहे.’’