मशिदीत न जाता घरातच नमाजपठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

  • भारतात ठिकठिकाणी मुसलमान नियम तोडून मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मुसलमानांच्या धर्मगुरूंनी तात्काळ असे आवाहन करणे आवश्यक होते. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ?
  • भारतात जेव्हा कायदे आणि नियम पाळण्याची वेळ येते, तेव्हा केवळ हिंदूच ते पाळतात आणि बहुतांश मुसलमान त्याचा भंग करतात, हेच खरे !

नवी देहली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुसलमानांनी मशिदीत जाऊन नमाजपठण करण्याऐवजी ते घरातच करावे; कारण मुसलमानांनी स्वतः सुरक्षित रहाण्यासह दुसर्‍यांना हानी होण्यापासून वाचवावे, असे आवाहन ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने केले. देशभरात दळणवळण बंदी घोषित केल्यानंतरही देशातील अनेक भागांमध्ये मुसलमान नमाजपठण करण्यासाठी मशिदीत जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ‘घरून नमाजपठण करावे’, असे आवाहन केले आहे.

भाग्यनगर येथील इस्लामी युनिव्हर्सिटी जामिया निजामिया यांनी म्हटले आहे की, शुक्रवारच्या नमाजाला अत्यंत महत्त्व आहे; पण माणसांच्या जीवनालाही महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे.