पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्काच्या मर्यादेत वाढ

इंधन महागण्याची शक्यता

नवी देहली – नुकतेच केंद्र सरकारने संसदेत ‘अर्थ विधेयक २०२०’ सादर करून ते संमत केले आहे. या विधेयकामध्ये शासनाने इंधनाच्या उत्पादन शुल्कात एकूण १८ रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचे अधिकार मिळवले आहेत. नव्या विधेयकानुसार शासनाला पेट्रोलवर १८, तर डिझेलवर १२ रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचा अधिकार मिळाला आहे. यापूर्वी इंधनावर म्हणजेच पेट्रोलवर १० रुपये, तर डिझेलवर ४ रुपये इतके उत्पादन शुल्क लावण्याचे अधिकार होते. आता शासनाने विधेयकाद्वारे पेट्रोल आणि डिझेल यांवर अधिक ८ रुपयांचे उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार मिळवला आहे. इंधनाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.