संचारबंदीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

मुंबई – २३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. असे असतांना दुकाने बंद होतील, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.