रामनवमीला उत्तरप्रदेशात दंगली तर दूर, साधा शाब्दिक संघर्षही झाला नाही ! – योगी आदित्यनाथ

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करून हैदोस घालणार्‍या धर्मांधांना लगाम लावणे, ही काळाची आवश्यकता आहे. ‘दंगली रोखण्यासाठी आणि धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने जे केले’, असे अन्य राज्यांनीही करायला हवे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते ! – संपादक

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रामनवमीच्या म्हणजे १० एप्रिल या दिवशी  धर्मांधांनी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदूंच्या शोभायात्रांवर आक्रमणे करून दंगली घडवून आणल्या. यावर भाष्य करतांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले, ‘‘२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि ८०० पेक्षा अधिक शोभायात्रांचे आयोजन झालेल्या उत्तरप्रदेशात दंगल तर सोडाच, पण साधा शाब्दिक संघर्ष (‘तू तू मैं मैं’) ही झाला नाही ! याच कालावधीत पवित्र रमझान मास चालू असून अनेक ठिकाणी ईफ्तार मेजवान्याही आयोजित केल्या जात आहेत.’’

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये जोडलेल्या वरील कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशच्या ‘विकासा’च्या नूतन धोरणामुळे हे शक्य झाले. दंगली, गुंडगिरी आणि विघटनवादी तत्त्वे यांना राज्यात थारा नाही !’’