दिवसातून २ वेळाच आहार घेऊन कृशता येत असेल, तर आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा

आहार न्‍यून पडल्‍याने काहींचे वजन अजून न्‍यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्‍यास आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा.

व्‍यायामाने मानसिक स्‍थैर्यही वाढणे

नियमित स्‍वतःच्‍या क्षमतेनुसार व्‍यायाम केल्‍याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्‍वभावदोषही दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

वसंत ऋतूमध्‍ये होऊ शकणार्‍या त्‍वचा विकारांचा प्रतिबंध करण्‍यासाठी उटण्‍याचा वापर करा !

सध्‍या वसंत ऋतू चालू आहे. या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे अंगाला खाज येणे, त्‍वचेवर बुरशीचा संसर्ग (फंगल इन्‍फेक्‍शन) होणे, यांसारखे त्रास होऊ शकतात.

प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.

शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.

सततच्‍या सर्दीवर सोपा उपाय

सततच्‍या सर्दीचे एक कारण आणि त्यावरील उपाय

केसतोड (गळू) या विकारावर सोपा घरगुती उपचार

. . . केसतोड किंवा गळू झालेल्‍या ठिकाणी या कापसाच्‍या चकतीने शेक देऊन चिंधीच्‍या साहाय्‍याने ती चकती केसतोडावर बांधावी. दिवसा बांधलेला कापूस रात्री आणि रात्री बांधलेला दिवसा काढावा (सोडावा) आणि बरे होईपर्यंत पुन्‍हा याच पद्धतीने बांधावा.

गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते. ‘स्‍वयंशिस्‍त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते.