वसंत ऋतूमध्‍ये होऊ शकणार्‍या त्‍वचा विकारांचा प्रतिबंध करण्‍यासाठी उटण्‍याचा वापर करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७१

‘सध्‍या वसंत ऋतू चालू आहे. या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे अंगाला खाज येणे, त्‍वचेवर बुरशीचा संसर्ग (फंगल इन्‍फेक्‍शन) होणे, यांसारखे त्रास होऊ शकतात. यांचा प्रतिबंध होण्‍यासाठी प्रतिदिन पुढीलप्रमाणे अंगाला उटणे लावून अंघोळ करावी.

पाव किलो चणाडाळीच्‍या किंवा मसूरडाळीच्‍या पिठामध्‍ये ५० ग्रॅम उटणे मिसळून डबीत भरून ठेवावे. अंघोळीच्‍या वेळी अंगावर पाणी ओतल्‍यावर या मिश्रणातील १ – २ चमचे कोरडे चूर्ण अंगाला चोळून लावावे. उटणे नियमित लावल्‍याने अनावश्‍यक मेद (चरबी) न्‍यून होण्‍यासही साहाय्‍य होते, तसेच त्‍वचा कांतीमय होते. उटणे लावल्‍यास साबण लावण्‍याची आवश्‍यकता नाही. (अगदीच तेलकट वाटणार्‍या भागांना साबण लावण्‍यास आडकाठी नाही.)’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

सनातनचे उटणे उपलब्‍ध आहे.
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्‍यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर उपलब्ध आहे.