प्रयत्नांविषयी ईर्ष्या असावी

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६९

वैद्य मेघराज पराडकर

हेतौ ईर्ष्येत् फले न तु । – अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्‍लोक २५

अर्थ : फळाविषयी नव्हे, तर प्रयत्नांविषयी ईर्ष्या करावी.

एखाद्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली, तर माझीही व्हायला हवी किंवा एखाद्याकडे भरपूर पैसे असतील, तर माझ्याकडेही तेवढे किंवा त्याहून अधिक पैसे असायला हवेत, ही झाली फळाविषयीची ईर्ष्या. यातून मन सतत इतरांशी तुलना करत रहाते आणि त्याने ताणतणाव वाढतो. हे आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे ही ईर्ष्या नसावी.

याउलट (फळाची अपेक्षा न धरता) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्यासाठी किंवा भरपूर श्रीमंत होण्यासाठी अमक्याने कोणते प्रयत्न केले, तेवढे किंवा त्याहून अधिक मी प्रयत्न करीन, ही झाली प्रयत्नांविषयीची ईर्ष्या. ही ईर्ष्या दोष नसून गुण आहे.

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर  करा !