निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७२
व्यायामः स्थैर्यकराणां श्रेष्ठः । – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २५, सूत्र ४०
अर्थ : स्थैर्य आणणार्या गोष्टींमध्ये व्यायाम सर्वश्रेष्ठ आहे.
‘व्यायामामुळे जसे शारीरिक स्थैर्य वाढते, तसे मानसिक स्थैर्यही वाढते. नियमित स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम केल्याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्वभावदोषही दूर होण्यास साहाय्य होते. त्यामुळे नियमित व्यायाम करावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२३)