शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

पुरेसा आहार घेऊनही शरीर सुकत चालले असेल, तसेच गालफडे बसली असतील, तर प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होऊन गाल वर येण्यास साहाय्य होते.

वैद्य मेघराज पराडकर

आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते. औषध घेतल्यानंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरावा.

वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२३)