सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्‍यावा !

सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्‍यास त्‍याला अन्‍नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्‍वच्‍छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्‍याची लक्षणे आहेत.

शांत निद्रेसाठी, तसेच केसांच्‍या आरोग्‍यासाठी प्रतिदिन झोपतांना डोक्‍याला तेल लावा !

बर्‍याच जणांना रात्री लवकर झोप न लागणे, तसेच मध्‍ये जाग आली, तर पुन्‍हा झोप न लागणे यांसारखे त्रास असतात. प्रतिदिन रात्री झोपतांना डोक्‍याला तेल लावल्‍यास हा त्रास बरे होण्‍यास साहाय्‍य होते.

व्‍यायामाविषयी उदासीनता नको !

‘अनेक रोगांवरील विनामूल्‍य औषध असलेला व्‍यायाम न करता लोक प्रतीमास सहस्रावधी रुपयांची औषधे घेण्‍यात धन्‍यता मानतात’, याला काय म्‍हणावे ?’

तापातून लवकर बरे होण्यासाठी खाण्याजोगे पदार्थ !

ताप आलेला असतांना शरिराची सर्व यंत्रणा तापातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी दूध, दही, पोळी, सुकामेवा, फळे यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.

विस्मरणावर प्राथमिक उपचार – सनातन ब्राह्मी चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

उन्हाळ्यात उपयुक्त सनातन उशीर (वाळा) चूर्ण !

उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या, नितंब (कुल्ले) इत्यादी भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे निर्माण होतात. या चकंदळांच्या कडा उचललेल्या, तांबूस आणि फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट अन् कोंडा असलेला असा दिसतो.

दुपारच्‍या वेळेत बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होईल, अशी उपाययोजना करा !

सध्‍या दुपारच्‍या वेळेत उन्‍हाची तीव्रता पुष्‍कळ वाढली आहे. त्‍यामुळे दुपारच्‍या वेळी बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होण्‍यासाठी छत्री, गॉगल इत्‍यादींचा वापर करावा.

वसंत ऋतूमध्‍ये निरोगी रहाण्‍यासाठी सोपे उपाय

नियमित व्‍यायाम करणे, सकाळी १० वाजेपर्यंत काही न खाणे, भूक लागल्‍यावरच खाणे, रात्री ८ वाजेपर्यंत जेवणे आणि पुरेशी झोप घेणे एवढ्याच गोष्‍टींचे पालन केले, तरी वसंत ऋतूमध्‍ये होणार्‍या विकारांना प्रतिबंध होऊ शकतो.

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ऋतूची लक्षणे दिसू लागली की, ऋतू चालू होणे

चैत्र-वैशाख (हा) वसंत ऋतू’ असे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हे कालमापनाच्‍या दृष्‍टीने योग्‍य आहे; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ‘जेव्‍हा ऋतूची लक्षणे दिसू लागतात, तेव्‍हा तो ऋतू’, असे म्‍हणतात.