कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेले ‘एस्.एस्.आर्.एफ्’चे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर (वय ५३ वर्षे) !

वैशाख कृष्ण द्वितीया (१७.५.२०२२) या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यातील साम्याविषयी ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

गोकुळात जेव्हा मुसळधार पाऊस पडून पूर आला होता, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपींचे रक्षण केले होते. त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वीवर आपत्काळ येईल, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये आश्रय देऊन त्यांचे रक्षण करतील अन् त्यांचे हे कार्य गोवर्धन पर्वत उचलल्याप्रमाणेच असेल.

एस्.एस्.आर्.एफ.च्या विदेशातील साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी

विदेशातील साधकांना साधना करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत. ‘त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते ?’, हे देत आहोत यातून ‘भारतात साधना करण्यासाठी किती अनुकूल वातावरण आहे !’, हे लक्षात येते.

विदेशात धर्माचरण केल्यावर तेथील लोकांनी थट्टा करणे आणि त्यांच्या मनात आध्यात्मिक संघटनांविषयी अविश्वास असणे

विदेशात साधना करतांना तेथील साधकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाविषयी मी आभारी आहे. ‘एखाद्याला व्यसन असण्याचे कारण ‘पूर्वजांचे त्रास’ हे असू शकते’, हे मी कधीच ऐकले नव्हते आणि कधी तसा विचारही केला नव्हता. ही पुष्कळ उपयुक्त माहिती आहे. मी आजपासूनच नामजप करायला आरंभ करीन.

ऑस्ट्रिया येथील इतिहासकार आणि राजकारणी डॉ. नास्को यांची एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी झालेली भेट !

गेल्या काही मासांपासून ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले युरोपमध्ये अध्यात्मप्रसारानिमित्त दौरा करत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांची ऑस्ट्रिया येथील लोकप्रिय नेते डॉ. नास्को यांच्याशी भेट झाली.

एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजपाला आरंभ केल्यावर न्यास करून नामजप करतांना ज्याप्रमाणे शक्ती जाणवते, त्याप्रमाणे मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्ती जाणवली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या परीस स्पर्शाने त्यांच्यासम भासणारे एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले !

चैत्र कृष्ण दशमी (२५.४.२०२२) या दिवशी एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ.)’चा मार्च २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद येथे दिले आहे.

एस्.एस्,आर्.एफ.च्या विदेशात रहाणाऱ्या साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी

नवीन सदर : विदेशात प्रतिकूल स्थितीतही तळमळीने साधना करणारे एस्.एस्,आर्.एफ.चे साधक