एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट
एक जिज्ञासू
१. जगभरातील मानवजातीसाठी, मुख्यत्वे जे आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही करत असलेल्या दिव्य कार्यासाठी तुमच्यावर देवाची अशीच कृपा राहो.
२. प्रत्येक वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर मी भावस्थिती अनुभवतो.
३. एस्.एस्.आर्.एफ्.मध्ये मला धार्मिक आणि सांस्कृतिक विचारसरणीच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टीकोन पहायला मिळतो, जो व्यक्तीचे नागरिकत्व, वंश किंवा रंग यांच्याशी संबंधित नाही. त्यामुळे तो (वैज्ञानिक दृष्टीकोन) सर्व जण सहजतेने आचरणात आणू शकतात आणि हे पुष्कळ आश्चर्यकारक आहे.
४. ‘एस्.एस्.आर्.एफ्. मला अध्यात्मात पुढच्या टप्प्याला घेऊन जाईल’, अशी मी आशा करतो.
दुसरे जिज्ञासू, अमेरिका
‘एखाद्याला व्यसन असण्याचे कारण ‘पूर्वजांचे त्रास’ हे असू शकते’, हे मला एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरून समजले ! : तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाविषयी मी आभारी आहे. ‘एखाद्याला व्यसन असण्याचे कारण ‘पूर्वजांचे त्रास’ हे असू शकते’, हे मी कधीच ऐकले नव्हते आणि कधी तसा विचारही केला नव्हता. ही पुष्कळ उपयुक्त माहिती आहे. मी आजपासूनच नामजप करायला आरंभ करीन. (ऑक्टोबर २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |