परात्पर गुरुपदावर असूनही स्वतःला प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य संबोधून सतत शिष्यभावात रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यभावात असतात. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सनातनची गुरुपरंपरा दर्शवणारी ५ छायाचित्रे लावली आहेत. त्यापैकी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राखाली ‘शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे लिहिले आहे.