अवैध बांधकाम आणि विनापरवाना चालू असणारे उपाहारगृह ‘सील’ !
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मोहिमेत जिल्ह्यासाठी ६ लाख ३ सहस्र राष्ट्रध्वज लागतील. नागरिकांनी ९०० मिमी बाय ६०० मिमी आणि ४५० बाय ३०० मिमीचे ध्वज घरावर लावावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.’’
संरक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळामध्ये ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ हे नौदलाचे अभियांत्रिकी महाविद्यालय जे महाराष्ट्रात होणार होते, ते स्थानांतर करून केरळमध्ये नेले, यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये असंतोष आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या सांगली केंद्राच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ३१ जुलै या दिवशी आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
राज्यशासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव पालटण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्गफलकांची नावे मात्र जुनीच आहेत. तरी ‘एस्.टी.’च्या मार्गफलकांची नावेही पालटा…
येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मिरुखेवाडी येथील ८० कुटुंबातील २५० नागरिकांना भूस्खलनचा संभाव्य धोका असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून स्थलांतरित केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्या आणि येणार्या वारकर्यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे.
जिल्ह्यासह मराठवाड्यात ८ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ‘४.९ रिस्टर स्केल’ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.