Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून ‘वैष्णोदेवी श्राइन बोर्डा’च्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीनंतर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून तेथे  वैष्णोदेवी श्राइन बोर्डच्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, मंदिराचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्था आता थेट प्रशासनाच्या (सरकारच्या) नियंत्रणाखाली जाऊ शकते. म्हणजे श्रीराममंदिराचेही सरकारीकरण होऊ शकते.