दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

नवी मुंबई, २६ जून (वार्ता.) – तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था झाल्याचे वृत्त २४ जून या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची नोंद घेत महानगरपालिकेच्या अभियंता विभागाकडून पदपथाची सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे पदपथकाही ठिकाणी खराब झाले होते. त्यांवरील लाद्या उखडल्या गेल्या होत्या. काही ठिकाणी लाद्यांना धार असल्याने नागरिकांना गंभीर ठेच लागून ते घायाळ होत होते. महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आता पदपथ आणि लाद्या यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याने त्यात सुधारणा होईल.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !