बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे सत्र चालूच !
गोपालगंज (बांगलादेश) – जिल्ह्यातील काशियानी येथे अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबातील ४ सदस्यांवर आक्रमण करण्यात आल्याची माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेने दिली. हे आक्रमण शेजारील मुसलमान कुटुंबाशी राष्ट्रीय निवडणुकीतील मतदानावरून झालेल्या जुन्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेजारी रहाणारा अजिबर मोल्ला हा युनियन परिषदेचा सदस्य असून त्याने साथीदारांसह हिंदु कुटुंबावर काठ्या आणि स्थानिक बनावटीची शस्त्रे यांद्वारे आक्रमण केले.
ही घटना गोपालगंज जिल्ह्यात असलेल्या काशियानी उपजिल्ह्यातील बेथुरी युनियन अंतर्गत येणार्या रामडिया ईस्ट पारा गावात २५ जूनच्या दुपारी घडली. घायाळांमध्ये क्षितीश बिस्वास (वय ६५ वर्षे), त्यांची पत्नी तुळशी बिस्वास (वय ५० वर्षे), मुलगी इति राणी बिस्वास (वय ३० वर्षे) आणि त्यांचा नातू देबराज बिस्वास (वय १५ वर्षे) यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली आहे.

कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !